अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी नव्हे तर भरीव मदत मिळून देणार:- खासदार प्रतापराव जाधव (APALA VIDARBH LIVE NETWORK)
शासन स्तरावर पाठपुरावा करणार,नुकसान ग्रस्तांना तात्काळ सानुग्रह मदत..!
अतिवृष्टीमुळे प्रंचड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे आज शेंगाव तालुक्यातील मौजे खातखेड,बोंडगाव,मनसगांव,भोनगांव,सगोडा,भास्तन या नुकसान ग्रस्त गांवाना शिवसेना नेते खासदार मा.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी भेट देवून नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली व प्रशासनाला सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.व तसेच जळगाव जामोदतालुक्यातील गाळेगांव बु,भेंडवळ,सखारामपुर चावरा मंडाखेड बु,
मंडाखेड खुर्द,आकोली खुर्द,आकोली बु,राजपूर व जळगाव जामोद शहर येथे जावून सुध्दा पाहणी केली प्रशासनाकडून आढावा घेतला व मदतीपासून नुकसान ग्रस्त वंचित राहता कामा नये अशा जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. इरशाळवाडीसाठी Minister Chandrakant दादा पाटील यांच्याकडून 11 लाख रूपयांच्या मदतीचा धनादेशमुख्यमंत्री Chief Minister यांच्याकडे धनादेश सुपूर्द
स्थलांतरण तसेच अन्नधान्य सुविधा उपलध करून देण्याचे प्रशासनाला आदेश जळगाव जामोद,संग्रामपुर आणि शेंगाव तालुक्यात अतिवृष्टी मुळे संपूर्ण शेती जलमय होऊन नागरिकांच्या घरात पाणी गेले होते. जनतेला सुरक्षित आणि सजग रहाण्याचे आवाहन केले. शेगाव तालुक्यातील विविध गावात पूरस्थिती आहे. दिनांक 18जुलै ते 23 जुलै दरम्यान अतिवृष्टी झाली. शेंगाव,सग्रांमपुर,जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला.रात्रीच्या सुमारास जोरदार पावसामुळे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. अन्नधान्य व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अतिवृष्टीच्या संकटामुळे नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतीला सुद्धा याचा फटका बसला आहे. त्यामुळे हे संकट सर्वांसाठीच मोठे संकट ठरले आहे. या नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असतो. या वेळीसुद्धा त्यांना सर्वकष मदत मिळावी, यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.राजू पाटील मिरगे,मा.देविदास घोपे,माजी उपजिल्हाप्रमुख संतोष लीप्ते,शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर,जळगाव जामोद ता.प्रमुख अजय पारस्कर,मा.उपसभापती बबनराव तुपे,ता.संघटक अनंता बकाल,शहरप्रमुख अरुण ताडे,युवासेना ता.प्रमुख उमेश शेळके,मा.संजय भुजबळ,मा.बाळु पाटील शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.