खाजगी बसचा समृद्धी महामार्गावर अपघात बस पेटल्याने 22 जणांचा मृत्यू,
(Apala vidarbh live देवानंद सानप बुलडाणा)
बुलढाणा जिल्ह्यातील येथील सिंदखेडराजा हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे लक्झरी बसला अपघात होऊन आग लागल्याने 20 ते 22 प्रवाशांचा आगीत होरपळुन मृत्यू तर या अपघातामध्ये 4 मुलांचाही समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 29 बी ई 1819 ही 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जात होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने खाजगी ट्रॅव्हल्सच्या धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. पलटी झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने काही मिनिटामध्ये पेट घेतला. त्यानंतर गाडीचा स्पोट होवून संपूर्ण ट्रॅव्हल पुर्णपणे जुळून खाक झाली. या ट्रॅव्हल्समधील अंदाजे 20 ते 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील प्रवाशांचा मात्र होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.