जिल्ह्यातील अधिकाधिक गावे हर घर जल करण्याचे आवाहन जिल्हा परिषद बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी-भाग्यश्री विसपुते
(Apala vidarebh Network)
बुलढाणा जल जीवन मिशन अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकांना नियमित, पुरेसे व कार्यान्वित नळाद्वारे पाणीपुरवठा होण्यासाठी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ज्या गावांना 100% नळ कनेक्शन आहेत तेथील शाळा, अंगणवाडी व संस्थात्मक स्तरावर पाण्याची व्यवस्था आहे अशी अधिकाधिक गावे हर घर जल घोषित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.
राज्यात तसेच बुलढाणा जिल्ह्यातही सन 2019 पासून जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास कार्यान्वित नळाद्वारे दरडोई 55 लिटर प्रमाणे पाणीपुरवठा करणे हे शासनाचे धोरण आहे. त्यामध्ये केवळ नळ कनेक्शन देणे हाच उद्देश नसून तर शाश्वत पुरवठा ची सुविधा निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी जिल्ह्यात प्रभावीपणे या अभियानाची अंमलबजावणी होत आहे. या अभियाना अंतर्गत ज्या गावांत शंभर टक्के नळ कनेक्शन झालेले आहेत, त्यांना 55 लिटर प्रमाणे पाणीपुरवठा होत आहे, तसेच तेथील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत व इतर संस्थात्मक कार्यालयांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे अशी गावे जल जीवन मिशन च्या संकेतस्थळावर हर घर जल म्हणून घोषित करण्याचे निर्देश प्राप्त आहेत. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील अधिकाधिक गावे हर घर जल म्हणून घोषित करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे. ग्रामसभेतून गावे हर घर जल घोषित करावयाची आहेत. यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिलेले आहेत. या कामी गावकऱ्यांनी, लाभार्थ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. सदर योजना कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग राहुल जाधव तसेच प्रकल्प संचालक जल जीवन मिशन शिवशंकर भारसाकळे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी, तालुकास्तरीय स्वच्छ भारत मिशनचे समन्वय, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तसेच उपविभागाचे अधिकारी कर्मचारी आणि पंचायत समिती स्तरावरील अधिकारी कर्मचारी मेहनत घेत आहेत.