शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावु नये व शासनाची मदत वळती न करता शेतकऱ्यांना अदा करावी.
अन्यथा बॕकेमध्ये शेतकऱ्यांना घेऊन मुक्काम आंदोलन करु - डाॕ.ज्ञानेश्वर टाले
बुलढाणा. दि.२०जुलै २०२३ रोजी शाखा व्यवास्थापक भारतीय स्टेट बॕक शाखा डोणगांव ता.मेहकर जि.बुलढाणा
शाखा व्यवास्थापक विदर्भ कोकण ग्रामिण बॕक शाखा डोणगांव ता.मेहकर जि.बुलढाणा.यांना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आले की, शेतकऱ्यांच्या खात्याचे तात्काळ होल्ड काढुन शासनाने दिलेली मदत इतरत्र कर्ज खात्यात वळती न करता अदा करावी शासनाने दिलेल्या सुचनाचे तंतोतंत पालन करावे.असे शाखा व्यवास्थापकास सांगितले व आपल्या शाखेतील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावल्या बाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे केल्या असून सध्या शेतकरी खरिपाच्या पेरणीच्या अनुषंगाने आर्थिक संकटात असून शासनाने शेतकऱ्याला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व आंदोनाच्या दणक्याने पिक विमा मंजूर करून राज्य सरकारने दखल घेत
खात्यामध्ये जमा केला असून तसेच सन २०२१ - २२ व २०२३ ची अतिवृष्टीची मदत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा पिक विमा खात्यात जमा झाला असून देखील त्यांच्या खात्याला होल्ड लावलेला असल्यामुळे त्यांना फवारणीचे औषधे डवरणी कुरपणी खत पाण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने शेतकरी हा आर्थिक अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शासनाने केलेल्या मदतीची रक्कम कुठेही पिक कर्ज खात्यात व इतरञ वळती करू नये तसेच होल्ड लावू नये अशा सूचना शासन निर्णयाप्रमाणे शासनाने दिलेल्या आहेत तरी सुद्धा आपण शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावलेले आहेत. सदर होल्ड तात्काळ काढून शेतकऱ्यांना शासनाने दिलेली रक्कम अदा करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या शाखेमध्ये मुक्काम आंदोलन करण्यात येईल व उद्भवणाऱ्या परिस्थितीला संबंधित प्रशासन जबाबदार असेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.असा इशारा निवेदन देऊन जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी दिला.सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी बुलढाणा.जिल्हा लिड बॕक अधिकारी,बुलढाणा. तहसिदार मेहकर जि.बुलढाणा.यांना देण्यात आल्या.यावेळी डाॕ.ज्ञानेश्वर टाले जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना बुलढाणा,अनिल बोरकर देवेंन्द्र आखाडे,राजु पळसकर,अमोल वाघमारे,वैभव आखाडे,गणेश धाबे,जावेद खाॕन,केळे,गणेश इंगळे,दिपक बनसोडे.सह शेतकरी उपस्थित होते.