आज प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्या मान्य करून घेण्यासाठी घातले साकडे
बुलढाणा नुकत्याच सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान बुलढाणा मोताळा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी 25 जुलै रोजी विधानसभेत राज्यभरातील पाणीपुरवठा स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी यांच्या सेवा नियमित करण्यासाठी व पगारवाढीसाठी मुद्दा उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने आज राज्यभरातील कंत्राटी कर्मचारी यांनी आमदार संजय गायकवाड यांचे बुलढाणा येथील कार्यालय मातोश्रीवर येऊन त्यांचे शतशः आभार मानले सदर मांडलेल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांना साकडे घातले. त्यांनी ही लवकरच आपल्या मागण्या मान्य करून देण्याचे आश्वासन दिले.
दिनांक 25 जुलै रोजी बुलढाणा मोताळा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेमध्ये स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी यांना नियमित सेवेत सामावून घ्यावे तसेच दहा वर्षापासून त्यांना पगारवाढ सुद्धा मिळालेले नाही ती त्यांना तात्काळ लागू करावी हे मुद्दे मांडले होते. त्या अनुषंगाने आमदार आज बुलढाण्यात पोहचताच राज्यभरातील पाणीपुरवठा स्वच्छता विभागातील जिल्हास्तरीय सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी त्यांची भेट घेऊन शाॅल, हार, पुष्पगुच्छ तसेच सन्मानपत्र देऊन त्यांचे आभार मानले, तसेच सदर मागण्या मान्य करून घेण्यासाठी साकडे घातले. या भेटीदरम्यान संजय गायकवाड यांनी उपस्थित सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले. समस्या समजून घेतल्या व लवकरात लवकर मागण्या मान्य करून घेण्याबाबत अश्वासित केले. यासाठी लवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांचे बैठक घेणार असल्याबाबत त्यांनी सांगितले. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.