Gadchiroli फिल्मी स्टाईल ने सापळा रचून अखेर त्या आरोपीला कोरची By the police पोलिसांनी केले जेरबंद - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, July 18, 2023

Gadchiroli फिल्मी स्टाईल ने सापळा रचून अखेर त्या आरोपीला कोरची By the police पोलिसांनी केले जेरबंद

फिल्मी स्टाईल ने सापळा रचून अखेर त्या आरोपीला कोरची पोलिसांनी केले जेरबं

(APALA VIDARBH LIVE अनिल गुरनुले प्रतिनिधी गडचिरोली) सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकुवर यांच्या सह चमुने केली मथुरा येथे अटक

 डचिरोली कोरची तालुका अंतर्गत येत असलेल्या कोचीनारा येथे 2 जुलै ला पती पत्नीच्या जुन्या किरकोळ वादामुळे आरोपी पती प्रीतराम धकाते यांनी कुऱ्हाडीने आपल्या पत्नीची जंगलात हत्या केली होती तसेच बचावासाठी गेलेल्या मुलीच्या पाठीवर वार करून हाथ सुद्धा फ्रॅक्चर केले होते. घटनेला अंजाम देऊन आरोपी हा घटना स्थळावरून फरार झाला होता. तब्बल 15 दिवस आरोपीने पोलीस विभागाला चकमा देत ट्रान्सपोर्ट साठी जाणाऱ्या ट्रक मध्ये बसून प्रवास केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा उत्तरप्रदेश येथील मथुरा येथे साधूची वेशभूषा परिधान करून राहत असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस स्टेशन कोरची येथील सहाय्यक पोलीस निरक्षक गणेश फुलकुवर यांनी आपल्या सोबत 3 सहकाऱ्यांना घेऊन मथुरा गाठले. आरोपिला शोधताना त्याला याची कल्पना होता कामा नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी साधूचे वेश परिधान करून व उर्वरित पोलीस कर्मचारी यांनी रिक्षा चालक, चने विक्रीचा धंदा लावून सापळा रचून प्रीतराम याला मथुरा येथे 5 दिवसानंतर पकडले. काही वर्षांपूर्वी सिने अभिनेते अमीर खान यांनी अशीच भूमिका सरफरोश या सिनेमा मध्ये साकारली होती परंतु खून करणाऱ्या आरोपिला अशा प्रकारे अटक केल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकुवर हे रियल लाईफ चे अभिनेते झाले असल्याचे दिसून येत असून सर्वत्र त्यांची या कार्यवाहीमुळे प्रशंसा केली जात आहे.

कोचीनारा येथील काही लोकांना घटनेचा दिवशी जिवे मारण्याची धमकी दिली होती म्हणून परिसरात त्याची दहशत पसरली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकुवर यांच्या सोबत पोलीस कर्मचारी तेजराम मेश्राम, नरेंद्र धोंडणे, शिवचरण भालेराव यांनी गाठले होते मथुरा. आरोपीवर कलम 302, 326, 506 भादवी अंतर्गत गुन्हा केला करण्यात आलेला आहे.

Post Top Ad

-->