मुंबई, रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळगड येथे काल मध्यरात्री दरड कोसळण्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात काही नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी पहाटेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री यांनी स्वतः नेतृत्व करीत मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वैयक्तिकरित्या व लोकसहभागातून मदत देण्याचे जाहीर केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी वैयक्तिकरित्या एक लाख आणि लोकसहभागातून दहा लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.
Friday, July 21, 2023
Home
Mumbai
Mumbai, इरशाळवाडी दुर्घटनेतील मृत व जखमींच्या मदतीसाठी Chief Minister मुख्यमंत्री सहायता निधीला संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून हातभार
Mumbai, इरशाळवाडी दुर्घटनेतील मृत व जखमींच्या मदतीसाठी Chief Minister मुख्यमंत्री सहायता निधीला संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून हातभार
Post Top Ad
आम्ही आपला विदर्भ लाईव्ह या वाहीनीची निर्मिती केली जनसामान्यांची शक्ती एक केंद्रित झाली तर कोणतीही ताकद तिला अडवू शकत नाही त्यासाठीच या उपक्रमात आपली साथ आम्हाला मोलाची आहे सहभागी व्हा सहकार्य करा आणि ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीविषयी त्या गावाविषयी कृतज्ञ भाव ठेवून आमच्या वहिनीला तुमच्या सेवेची संधी द्या चला तर मग एक नवे क्षितीज. नव्हे एक नवे स्वप्न आपण मिळून पाहूया आपला विदर्भ लाईव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास आपला विदर्भाचा व देशाचा विकास हे ब्रिद वाक्या मनाशी बाळगून या उपक्रमाची एकजुटीने आपला विदर्भ लाईव्ह या वृत्तवाहिनीला आपले हक्काचे व्यासपीठ बनवूया...