(APALA VIDARBH LIVE देवानंद सानप लोणार)
आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने हेल्मेट जनजागृतीसाठी शेगाव शहर आणि शेगाव ग्रामीण पोलिसांनी मोटर सायकल रॅली काढून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट जरुरी का आहे याचे महत्व पटवून देण्याचे प्रयत्न करण्यात आले.
वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर अपघातही वाढले आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळे काही वर्षांपूर्वी हेल्मेट सक्ती जिल्ह्यात करण्यात आली होती. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात होती. मात्र आता पोलिसांनी सक्तीपेक्षा जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरु केलाय. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव आणि ग्रामीण भागात पोलिसांनी हेल्मेट घालून शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यावरून मोटार सायकल रॅली काढली