Buldhana, समृद्धी महामार्गावर कार पलटी होऊन दोन गंभीर - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, August 13, 2023

Buldhana, समृद्धी महामार्गावर कार पलटी होऊन दोन गंभीर


  (APALA VIDARBH LIVE देवानंद सानप प्रतिनिधी लोणार)

समृद्धी महामार्गावर चैनल नंबर 306.3मुंबई कँरीडाँर वर कार चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहणावरील ताबा सुटून कार पलटी झाल्याने कार चालक व एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि 13/08/2023 सायंकाळी 5.20 वाजेदरम्यान घडली. जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले

याबाबत सविस्तर वृत्त असे की सम्रुध्दी महामार्ग वर पेट्रोलिंग करीत असताना C.NO 306. वर अपघात झाल्याची माहिती पेट्रोलिंग पथकाला मिळाल्याने सदर ते मदत कार्य ठिकाणी पोहचले. हकीकत अशाप्रकरे आहे की उपकेंद्र दुसरबीड म.पो.केंद्र मलकापूर जि. बुलढाणा येथे समृद्धी महामार्ग वर चॅनल नंबर 306.3 मुबंई कॉरिडॉर वर कार क्रमांक GJ 03 LG 8419 चे चालक नामे पार्थ हरपाल वय 35 वर्ष सोबत प्रवीण मधुकर खडसे वय 19 वर्षे रा. वाशिम. हे वाशिम कडून औरंगाबाद कडे जात असताना सदर वाहन चालक यांना झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटल्याने सदरचे वाहन पलटी होऊन मिडीयम लाइन मध्ये आल्याने वाहनातील वाहन चालक नामे पार्थ हरपाल वय 34 वर्षे रा. राजकोट हे गंभीर जखमी झाले असून, सोबत असलेले प्रवीण खडसे हे किरकोळ जखमी झाले आहे. त्यांना औषध उपचार कामी पीएसआय पवार एनपीसी 20 70 पीसी 10 69 यांनी जखमींना तात्काळ तात्काळ ॲम्बुलन्स द्वारे ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे पाठवण्यात आले आहे. तसेच अपघाताग्रस्त वाहन रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू केली

Post Top Ad

-->