संतप्त नागरिकांनी केला Anganwadi अंगणवाडीच्या इमारतीचा वाढदिवस साजरा..
मामा आम्हाला अंगणवाडी द्या हो चिमुकल्यांनी घेतले फलक हातात
डोणगाव येथील वार्ड क्रमांक एक मधील अंगणवाडीचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे मागील सात वर्षात पूर्णतःवास न आल्याने आज चिमुकल्यासह संतप्त नागरिकांनी त्या अंगणवाडीचा इमारतीचा मोठ्या थाटामाटात केक कापून वाढदिवस साजरा करत निषेध नोंदवला आहे
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या डोणगाव मध्ये जवळपास 16 अंगणवाड्या असून येथील कित्येक अंगणवाडीकेंद्र हे जागे अभावी भाड्याच्या टोटक्या जागेत भारतात तर काही अंगणवाड्या हया मागील कित्येक वर्षां पासून पूर्णतःवास आलेल्या नाहीत ज्याने हक्काची जागा असून सुद्धा अंगणवाड्या हया भाड्याच्या टोटक्या जागेत भारतात यावर डोणगाव वार्ड क्रमांक एक मधील युवकांनी अंगणवाड्याचा वाढदिवस साजरा केला.
डोणगाव येथील लोकसंख्या ही 40 हजाराच्या जवळपास असून येथे सद्य स्थिती मध्ये 16 अंगणवाड्या असून लवकरच 4 नवीन अंगणवाडीकेंद्र सुरु होणार असल्याची माहिती, मात्र अंगणगाडी केंद्रासाठी येथे वार्ड क्रमांक एक मध्ये पशु वैद्यकीय दवाखान्या मागे सात वर्षां पूर्वी एक मोठी अंगणवाडी इमारत बांधकाम झाले ही अंगणवाडी इमारत सात वर्षात पूर्णतःवास आली नाही.
ठेकेदाराला पूर्ण पैसे मिळाले की नाही पैसे हे सध्यातरी गुलदस्ता असलेले आहे मात्र अंगणवाडीकेंद्राचे काम पूर्णतःवास आले नाही ज्याने बंद पडलेल्या त्या अंगणवाडीच्या इमारती मध्ये कचरा, मोडके तोडके साहित्य पडलेले आहे अश्यात डोणगाव येथील वार्ड क्रमांक एक मध्ये शिवसेनेचे अमोल धोटे,सुरज दिनोरे, निलेश सदावर्ते, शे जुबेर,गजानन खिल्लारे, पवन वाणी, राना, राम मोरे यांनी अंगणवाडीकेंद्राचा केक कापून वाढदिवस साजरा केला तेव्हा अंगणवाडी मध्ये जाणारे बालके व महिला सुद्धा हजर होत्या.
डोणगाव मध्ये अंगणवाडी केंद्राची इमारत मंजूर होऊन झाल्याचे श्रेय घेतल्या गेलेत त्या नंतर त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले किव्हा नाही यांची खातरजमा लोकप्रतिनिधीनी घेतली नाही अश्यात महालक्ष्मी नगर वार्ड क्रमांक दोन अंगणवाडीकेंद्र इमारत, गजानन महाराज मंदिर मागील अंगणवाडीकेंद्र , पंचशील नगर मधील अंगणवाडीकेंद्र,अंधारवाडी मधील अंगणवाडीकेंद्र या इमारती मागील कित्येक वर्षां पासून पूर्णतःवास आलेल्या नसल्याने कुठे कुटार तर कुठे अतिक्रमण झालेले आहे जागे अभावी कित्येक ठिकाणी अंगणवाडी केंद्र हे टोटक्या जागेत भारतात यावर राजकारणी उदासीन दिसून येत आहे
माझ्या तत्कालीन पदाच्या सरत्या काळात सदर अंगणवाडी बांधकामांचे काम सुरू झाले होते व त्यानंतर माझा कार्यकाळ संपला होता मात्र माझ्यानंतर जे कुणी जिल्हा परिषद ला निवडून आले त्या सन्माननीय सदस्यांनी प्रशासनाकडून बांधकाम पूर्ण करून घ्यायला पाहिजे होते असे मला अपेक्षित होते परंतु त्यांच्याकडून सहा ते सात वर्षात सुद्धा हे बांधकाम का पूर्ण करण्यात आले नाही ही आश्चर्यचकित बाब असून या गोष्टीची वरिष्ठांचा मार्फत चौकशी होऊन ज्यांनी कोणी हे बांधकाम केले त्यांच्याकडून ते पूर्वतवास नेऊन ती अंगणवाडी मी दिली होती त्या अंगणवाडीत मुलं शिकायला आले पाहिजेत बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर ती अंगणवाडी मी दिली त्या ठिकाणी नाव उल्लेख सुद्धा असला पाहिजे सायली शैलेश सावजी माजी महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद बुलढाणा
देशाचे उज्वल भविष्य घडवणारे चिमुकल्या मुलांनी अंगणवाडी मिळावे यासाठी अंगणवाडीचा वाढदिवस साजरा तर केलाच मात्र मामा आम्हाला अंगणवाडी द्या हो असे फलक हाती घेऊन विनंती सुद्धा त्या ठिकाणी केली आल्याचे चित्र मात्र दिसून आले यावरून आपल्याला कळू शकते की स्थानिकांना साठी ही अंगणवाडी किती महत्त्वाची आहे. फलक हाती घेऊन अंगणवाडी मागणाऱ्या त्या चिमुकल्यांना न्याय मिळणार का शासन प्रशासनना सह लोकप्रतिनिधी सुद्धा यामध्ये लक्ष देतील का..? त्या अंगणवाडीचे बांधकाम मार्गी लावणार का हा मोठा प्रश्न मात्र आता निर्माण झाला आहे..
अंगणवाड्याचे बांधकाम अर्धवट पडल्याचे मूळ कारण बी.डी. सी.सी. बँक मुळे अर्धवट आहे.मागील काही वर्षात बी. डी. सी.सी. बँक बंद पडल्यामुळे अनेक अंगणवाड्यांचा बांधकामासाठी आलेला निधी अडकून पडला आहे त्यामुळे ह्या अंगणवाड्याचे अर्धावट बांधकाम होऊन निधी अभावी रखडल्या आहेत.संदिप गवळी एकात्मिक बाल विकास अधिकारी मेहकर