BULDHANA सरपंचा सह Gram sevak ग्रामसेवकावर झाले गुन्हे दाखल दाखल ..! - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, September 26, 2023

BULDHANA सरपंचा सह Gram sevak ग्रामसेवकावर झाले गुन्हे दाखल दाखल ..!


                             लाजलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई 

बुलडाणा. शासन प्रशासन नेहमीच वेगवेगळ्या योजनेतून गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देते त्यासाठी ग्रामसेवक व सरपंच हे गावाची धुरा सांभाळत असतात आणि गावाचा विकास हा केल्या जातो बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाला आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च सुद्धा केला जातो मात्र बहुतांश ठिकाणी हा निधी खर्च न करता वेगळ्याच कामासाठी वापरला जातो अशातलाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे जिल्ह्यातील दत्तापूर येथे जरा उलटच काही घडलंय शासन प्रशासनाकडून आलेला निधी मध्ये मोठा अपहार केला आहे. नेमकं घडलं काय जाणून घेऊया सविस्तर.

बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम दत्तापूर ग्रामपंचायत मध्ये तब्बल ५८ हजार ४०६  रुपयांचा अपहार झाल्याबाबत तत्कालीन सरपंच व तात्कालीन ग्रामसेवक यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे.

बुलडाणा  तालुक्यातील ग्राम ग्रामपंचायत दत्तपुर  मध्ये सन २०१३ ते २०१५ या कालावधीत तत्कालीन सरपंच सौ. उमा रमेश वानेरे व ग्रामसेवक श्री. आर. बी. जाधव यांनी ग्रामपंचायत दत्तपुर अंतर्गत झालेल्या विविध विकासकामांच्या शासकीय निधीमध्ये एकुण २३२४४९६ /- रुपये रकमेचा अपहार केल्याबाबत तकार झाली होती. तसेच तकारदार यांनी याच आशयाची तकार जिल्हा परीषद बुलढाणा यांचेकडे केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने जि.प. बुलढाणा यांनी चौकशी समीती नेमुण सदर प्रकरणात ५८४०६/- रुपयेचा अपहार झालेबाबत निष्कर्ष काढला होता.

मात्र सदर प्रकार हा लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाकडे सुद्धा तक्रार करण्यात आली होती  सदर तकार अर्जाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केलेल्या चौकशीवरुन व जि.प. बुलढाणा यांनी दिलेल्या अहवालावरुन ग्रामपंचायत दत्तपुर येथे तत्कालीन ग्रामसेवक. आर.बी. जाधव व तत्कालीन सरपंच सौ. उमा रमेश वानेरे रा. दत्तपुर ता.जि. बुलढाणा यांनी संगनमत करुन व पदाचा दुरुपयोग करुन सन २०१३ ते २०१५ या कालावधीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार रक्कम खर्च करतांना गृह विभागाचे दिनांक १४/०८/२००८ ने शासन निर्णयातील परीशिष्ट ७ नुसार आवश्यक बाबींवरील तरतुदी वगळता ६३% जादा खर्च रुपये २३८२०/- व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार रकमेतून केलेली बांधकामाची गौण खनीज रक्कम रुपये ३४५८६/- असे एकूण ५८४०६ /- रुपये रकमेचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत असल्याने त्यांचेविरूद्ध सरकारतर्फे श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. बुलढाणा याचे फिर्यादीवरून पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण येथे अपराध नंबर ३१४ / २०२३ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम-१९८८ कलम १३ (१) (क). १३ (२) सह भारतीय दंड संहिता कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परीक्षेत्र, अमरावती, देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती तसेच श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. महेश भोसले, पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा हे करीत आहेत.

झालेल्या कारवाईमुळे लाचलुचपत विभागाची सर्वत्र  कौतुक होत असून आता ग्रामपंचायत मध्ये आलेल्या निधीचा भ्रष्टाचार करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पोलीस निरीक्षक महेश भोसले
पोलीस निरीक्षक महेश भोसले
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक महेश भोसले यांनी मोठ्या चतुराईंनी तपास करत सदर प्रकरणाचा उलगडा केला आहे‌.

Post Top Ad

-->