आपला विदर्भ ची दखल घेत नागापूर ग्रामपंचायत लागली कामाला दि.28 सप्टेंबर रोजी रात्री केली धूर फवारणी.
कही खुशी कही गम धूर फवारणीचं काय झालं मग..!
बुलढाणा-:डोणगाव. नागापूर साथीच्या आजाराने नागापूरकर त्रस्त तर डेंग्यू सदृश्य अनेक रुग्ण असून यावर ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे दिवसेंदिवस साथीचे आजार ग्राम नागापूर गावात पसरतच होते अशातच दैनिक आपला विदर्भ ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले असता आरोग्य विभाग खडबडून जागी होऊन नागापूर या ठिकाणी सर्वेक्षण करून धूर फवारणीचे ग्रामपंचायत प्रशासनाला आदेश देली असता दिनांक 28 सप्टेंबर रोजी रात्री ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने धूर फवारणी केली मात्र ही धूर फवारणी संपूर्ण गावात झाली असल्याचे काही नागरिकांनी मत व्यक्त केले आहे. ही धूर फवारणी फक्त गाजावाजा करण्यासाठीच होती का असाही प्रश्न आता सुज्ञ नागरिक विचारत आहेत.सदर ग्रामपंचायत राहिलेल्या ठिकाणी सुद्धा धूर फवारणी करणार का की फक्त गाजावाजा साठीच हा प्रकार..? याकडे नागापूर करांचे लक्ष लागून आहे....