विद्युत पुरवठा कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवेदन व सूचना देऊनही दुर्लक्ष
(APALA VIDARBH LIVE महादेव तायडे)
वाशिम ;तालुक्यातील ग्राम आडगाव हजारे येथील राहत असलेल्या ग्रामस्थांच्या घरावरून गावठाण विद्युत पुरवठा करणारे विद्युत तार हे त्यांच्या घरावरून गेले आहे. सदर विद्युत पुरवठा 33 केव्ही लाईन सेनगाव वरून गणेशपुर आडगाव मार्गाने आलेली आहे. मागील चार ते पाच महिन्यापूर्वी विद्युत पुरवठा विभागाला पत्र देऊन सांगण्यात आले होते. की वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे हा खांब वाकलेला आहे.यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आपण याकडे लक्ष देऊन तो दुरुस्ती करण्यात यावा अशा सूचना देखील त्यांना लेखी निवेदन व फोटो कॉफी सह दिल्या होत्या परंतु याकडे विद्युत पुरवठा विभागाने अध्यापकी लक्ष दिले नाही.
मान्सून पूर्व सूचना देऊन देखील याकडे विद्युत पुरवठा विभाग व कर्मचारी यांनी पाठ फिरवल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.परंतु सततच्या पावसामुळे हा विद्युत खांब अधिकच खाली वाकत चालल्याने ग्रामस्थांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये जर तो मध्यरात्रीच्या वेळेत कोसळला तर यामध्ये सात ते आठ कुटुंबाचा जीव जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाला वेळोवेळी सांगून देखील दुरुस्त न केल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.