मोकाट श्वानांचे लसीकरण होणार का..?
बाबा मी शाळेत जात नाही हो खूप मोठे कुत्रे आहेत रस्त्यावर ह..ह..ह
मोकाट श्वानांपासून होऊ शकतो मोठा धोका...!
बुलढाणा डोणगाव: शहरासह महामार्गावर मोकाट श्वानां मोठ्या प्रमाणात दिसून येते आहेत राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा मुक्काम दिसून येत आहे. भल्याभल्यांना सुटतो घाम जवा कुत्रा दिसतो तवा म्हणतो बाबा थांब इतका मोठ्या प्रमाणात या श्वानांची दहशत आहे... जाणून घेऊया सविस्तर वृत्त
मोकाट,बेवारस,भटके श्वान यांची संख्या नियंत्रित ठेवणे,रेबीज निर्मुलन व मनुष्य - प्राणी संघर्ष टाळणे या दृष्टीने डोणगाव,ग्रामपंचायत प्रशासनाच्या द्वारे श्वान लसीकरण व निर्बीजीकरणाची मोहीम सुरु करणार का..? डोणगाव परिसरातील मोकाट श्वानांचे लसीकरण होणार का..?
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे मागील काही दिवसांपासून मोकाट, भटके श्वान ही अनेक ठिकाणची गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गाडीच्या मागे धावणे,चावा घेणे,रात्रीच्या वेळेस अंगावर धाऊन जाणे त्यामुळे अपघात होणे इत्यादी प्रकारचे त्रास या बेवारस कुत्र्यांमुळे होतात. पिसाळलेल्या श्वानांच्या चाव्यामुळं,अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी अनेक इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात.
प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० व ॲनिमल बर्थ कंट्रोल २००१ नुसार श्वानांना मारण्यास बंदी आहे. मात्र मोकाट, भटके श्वान यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते. यावर नियंत्रण आणण्यासाठी
डोणगाव ग्रामपंचायत प्रशासन सदर मोहीम राबविणार का..?
शहरात अंदाजे सेकडो बेवारस श्वान असुन त्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने निर्बीजीकरणाचे काम ग्रामपंचायत हाती घेणार का. आपल्या परीसरातील मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण तसेच लसीकरण करावयाचे असल्यास ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेने गरजेचे आहे..!
बाबा मी आज शाळेत जात नाही हो. बाबा का रे बाळा तुम्हाला काय सांगावं शाळेत जात असताना एवढे कुत्रे रोडवर असतात की मला खूपच भीती वाटते त्यामुळे बाबा मी शाळेत जात शाळेत जायचं असेल तर तुम्ही मला नेऊन सोडा शाळेत आणि घ्यायला सुद्धा या नाहीतर मी घरीच राहतो बाबा. मला खूप भीती वाटते.. हे आहे सत्यता एका शाळकरी मुलांनी आपल्या बाबाकडे केली वास्तव सत्य व्यक्त..!
संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन योग्य ते मार्ग काढणे गरजेचा असल्याचा सुद्धा सुज्ञ नागरिक बोलत आहेत