BULDHANA ,कृषि मेळाव्यात नम्रता ऍग्रो इंडस्ट्रीजचे सादरीकरण - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, October 15, 2023

BULDHANA ,कृषि मेळाव्यात नम्रता ऍग्रो इंडस्ट्रीजचे सादरीकरण

 

कृषि मेळाव्यात नम्रता ऍग्रो इंडस्ट्रीजचे सादरीकरण

(APALA VIDARBH LIVE) 

बुलढाणा.देऊळगाव राजा येथे दि.१३ ऑक्टोबर रोजी सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे साहेब यांच्या पुण्यतीठीनिमित्त कृषी मेळावा व सन्मान बळीराजाचा या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. या मेळाव्याला अनेक विभागांचे तसेच कंपनीचे स्टॉल लावण्यात आले होते, यामध्ये प्रामुख्याने नम्रता ऍग्रो इंडस्ट्रीजने आपल्या सिंचन क्षेत्रातील सर्व उत्पादनाचे सादरीकरण केले यावेळी या स्टॉलच्या माध्यमातून कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी हितगुज साधत त्यांना सिंचन पद्धती व त्याचे पिकाच्या वाढीसाठी होणारे फायदे समजावले. त्याचबरोबर महाराष्ट्रासह देशामध्ये सिंचन क्षेत्राचा विस्तार व्हावा याकरिता शासन ठिबक व तुषार संच साठी अनुदान अदा करते व त्याविषयीचे तपशील यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगत त्यांचे सकारात्मक आत्मपरिवर्तन केले. नम्रता ऍग्रो इंडस्ट्रीजचे ठिबक,तुषार संच, एचडीपीई,पीव्हीसी पाईप व मलचींग पेपर हे दर्जेदार व उच्च प्रतीच्या कच्चा मालापासून निर्मित केलेले असून ते अत्यल्प दरात सर्वसामान्य शेतकऱ्यांचे समाधान करणारे असून गुणवत्ते ची हमी देणारे आहे असा विश्वास यावेळी उपस्थित जनसमुदायाला देण्यात आला.

सदर सादरीकरण हे नम्रता ऍग्रो इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर कृष्णा ढगे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी याठिकाणी भेटी दिल्या यामध्ये प्रामुख्याने आमदार डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब उपस्थित होते त्यांचा सत्कार नम्रता ऍग्रो  इंडस्ट्रीज च्या वतीने जनरल मॅनेजर कृष्णा ढगे व सिनिअर सेल्स इंजिनियर ज्ञानेश्वर पुरुषोत्तम ईरतकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अनेक राजकीय पदाधिकारी,शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच वितरक,शेतकरी बंधू व विविध कंपनीचे कर्मचारी,सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर,महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी व परिसरातील अनेक नागरिकांचा समावेश होता.

विशेष आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी नम्रता ऍग्रो इंडस्ट्रीज भेट देऊन  शेतकऱ्यांच्या हितासाठी आधुनिक युगात शेतकऱ्यांनी नम्रता ऍग्रो इंडस्ट्रीज माध्यमातून फायदा करून घ्यावा... हे विशेष


 

Post Top Ad

-->