कृषिमंत्र्याला दिली पार्टीची ऑफर शेतकऱ्यांचा पोरान थेट लीहल कृषि मंत्र्यांना पत्र..
(APALA VIDARBHA LIVE दिपक पाटिल गोळे)
वाशिम,केनवड नजिक असलेल्या मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील रुद्र विजय शेंडगे, या चीमुकल्याने चक्क कृषी मंत्र्यांना गल्ला (पिगी बँक) फोडून पार्टी देण्याची ऑफर दिली आहे.वन्य प्राण्यांपासून पिकांचे सरक्षण करण्यासाठी रुद्रचे वडील गेल्या अनेक दिवसापासून शेतातच असल्याचे त्यांनी पत्रांमधून लिहिले आहे.या पत्रात कृषिमंत्री साहेब काल माझ्या पप्पाच्या मोबाईलवर पाहिले की पार्टी दिली की सरकारी लोक काम करतात मग,आम्ही तुम्हाला गल्ला फोडून त्यातील पैशाची पार्टी देतो आमचे पप्पा पोळा झाला,लक्ष्मी झाल्या,गणपती झाले परंतु रात्रंदिवस वावरात आहेत, मी त्यांना फोन करून विचारलं पप्पा घरी कधी येणार तर पप्पांनी सांगितलं आपल्या वावरात जंगलातील रोही, वानरे,हरिण सोयाबीन खातात त्यामुळे मी घरी येणार नाही.तेंव्हा साहेब तुम्हाला पार्टी देतो आमच्या वावरातल्या रोहि,वानरे, हरणाचा बंदोबस्त करा त्यांना आमचे वावरात येऊ देऊ नका, मग माझे पप्पा घरी येतील सरकारी लोक पार्टी घेऊन योजना देतात मग आमच्या पण सोयाबीनला भाव द्या,पिक विमा द्या,कर्जमाफी द्या.मी तुम्हाला साहेब पार्टी देतो माझ्या गल्ल्यातले पैसे पप्पांच्या चोरून घेऊन तुम्हाला पार्टी देतो साहेब असे त्या चिमुकल्यांने पत्रातून म्हंटले आहे..