BULDHANA शेळीपालनाच्या गोठ्याला आग 31 बकऱ्या जळून खाक 5 लाख रुपयाचे झाले नुकसान विठ्ठलवाडी येथील घटना - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, February 3, 2024

BULDHANA शेळीपालनाच्या गोठ्याला आग 31 बकऱ्या जळून खाक 5 लाख रुपयाचे झाले नुकसान विठ्ठलवाडी येथील घटना


(आपला विदर्भ लाईव्ह प्रतिनिधी राहुल चव्हाण)

बुलढाणा,डोणगाव येथून जवळ असलेली विठ्ठलवाडी (उध्दवा) येथे लागलेल्या  आगीमध्ये पवार यांचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे या आगीमध्ये जवळपास 31 बकऱ्या जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी  मौजे विठ्ठलवाडी (उध्दवा) येथील   भिमा दुधा पवार यांनी शिलाबाई  विठ्ठलराव देशमुख यांच्या शेतात उध्दवा  येथील शेत बटईने करतात त्याच शेतामध्ये  त्यांनी शेळीपालनासाठी एक गोठा बांधला असून त्यात ते बेळीपालन करत होते. आज दि. 3/02/2024 रोजी सकाळी अंदाजे 9:30 च्या दरम्यान गोठ्याला आग लागून त्यात बोकडे 24 व इतर शेळ्या अशा 31 शेळ्या  जळून मृत्यु पावल्या.


व 10 बकऱ्या जळून जखमी झाल्या तसेच गोठ्यातील कापड व लाकडे जळून खाक झाले. या आगीमध्ये सदर रहिवाशी भिमा दुधा पवार यांचे बकऱ्या सदृढ होत्या व त्यातील बऱ्याच बकऱ्या गाभन होत्या त्यात अंदाजे 5 लाख   रूपयाचे नुकसान झाले त्यांचे  मुळ उत्पादन शेळीपासूनच असल्याचे तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे.

Post Top Ad

-->