BULDHANA उपोषणाचा इशारा देताच बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी रुजू - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, March 9, 2024

BULDHANA उपोषणाचा इशारा देताच बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी रुजू


आपला विदर्भ live देवानंद सानप/बिबी

लोणार तालुक्यातील बिबी हे गाव महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो या गावांमध्ये दररोज खेड्यापाड्यामधून हजारो लोकांची ये जा सुरू असते.

बिबि या शहरात पोलीस स्टेशन, बँक,महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, आठवडी बाजार, कृषी उत्पन्न उपबाजार समिती, अनेक साहित्यांच्या बाजारपेठा असून बिबी गावाची लोकसंख्या सुमारे 12000 इतकी आहे सोबतच संभाजीनगर नागपूर महामार्ग या गावातून गेला आहे त्यामुळे अनेक नागरिकांची या गावात वर्दळ असते बिबी ग्रामीण रुग्णालयात अनेक महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने नागरिकांची व रुग्णांची आरोग्य समस्या विषयी मोठी हेळसांड होत होती.

काही दिवसांपूर्वी याच परिसरात एक मोठी घटना घडली होती सोमठाणा या गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी एकादशी दिवशी भगर खाल्ल्याने 500 जणांना विषबाधा झाली होती आणि बिबी परिसरात ग्रामीण रुग्णालय असून तिथे एक ही एम बि बी एस अधिकारी नसल्याची बाब लक्षात आल्याने बिबी नगरीचे सरपंच पुत्र दिपक गुलमोहर व त्यांचे सहकारी कैलास मोरे व अमोल मुळे व ग्रामपंचायत कार्यालयाने अनेकदा जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांना कळवूनही केराची टोपली दाखवल्या जायची मात्र बिबी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा देताच तात्काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. कुहिटे यांना जिल्हा शल्य चिकित्सक विभागाने बिबी ग्रामीण रुग्णालयात रुजू केले आहे.

 त्याचबरोबर जिल्हा शल्यचिकित्सक साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या संवादानुसार लवकरच पुन्हा एक वैद्यकीय अधिकारी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

सोबतच ग्रामीण रुग्णालयात गरजेच्या वस्तू पुरवठा करणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.

निवेदनात बिबी येथील अनागोंदी कारभाराबद्दल चौकशी करून कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकारी, एक्स-रे मशीन नियमित चालू ठेवावी, रक्त लघवी तपासणी मशीन तात्काळ उपलब्ध करून द्यावी, दंत विभागातील अपुऱ्या साहित्याची पूर्तता करावी, इ.सी.जी. मशीन नियमित रोलपट्टीसह चालू असावी. क्लार्क, बाबू ,कर्मचारी,आधिकारी, यांनी नियमित हजर राहावे. अशा मागण्या केल्या होत्या या संपूर्ण मागण्या आरोग्य विभागाने मंजूर केल्या आहेत

Post Top Ad

-->