बुलढाणा ; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र, न्यायालयाने बंदला नकार दिल्याने महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरात मूक निदर्शने करण्यात येत आहेत. त्यानुसार बुलढाणा येथे सुद्धा महाविकास आघाडीतर्फे मूक निदर्शने करण्यात आली. तोंडाला काळ्या फिती बांधून आणि हातात काळे झेंडे घेत बदालापूर येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
Post Top Ad
आम्ही आपला विदर्भ लाईव्ह या वाहीनीची निर्मिती केली जनसामान्यांची शक्ती एक केंद्रित झाली तर कोणतीही ताकद तिला अडवू शकत नाही त्यासाठीच या उपक्रमात आपली साथ आम्हाला मोलाची आहे सहभागी व्हा सहकार्य करा आणि ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीविषयी त्या गावाविषयी कृतज्ञ भाव ठेवून आमच्या वहिनीला तुमच्या सेवेची संधी द्या चला तर मग एक नवे क्षितीज. नव्हे एक नवे स्वप्न आपण मिळून पाहूया आपला विदर्भ लाईव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास आपला विदर्भाचा व देशाचा विकास हे ब्रिद वाक्या मनाशी बाळगून या उपक्रमाची एकजुटीने आपला विदर्भ लाईव्ह या वृत्तवाहिनीला आपले हक्काचे व्यासपीठ बनवूया...