जनता जनार्दन मला नक्कीच आशीर्वाद देईल
मेहकर विधानसभा मध्ये जो अन्याय अत्याचार मागील वीस पंचवीस वर्षापासून सुरू आहे त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी संविधानिक जे काही आयोग आहेत त्या आयोगाचा वापर करून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मेहकर विधानसभा जनतेचा उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित करीत असल्याचे भैय्यासाहेब पाटील म्हटले आहे ते पुढे म्हटले सध्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांनी लोककल्याणकारी योजना कोणतीच न वापरता फक्त कमिशन खोरी चालू असल्याचा आरोप करत त्याला वाचा फोडण्यासाठी आणि एक चांगलं कार्य करण्यासाठी मी ठामपणे सक्षमपणे या विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे भैय्यासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये म्हटले आहे..
मी जनतेचा उमेदवार आहे,,,
पत्रकार परिषद घेऊन केली जंगी सुरुवात मेहकर संत श्री गजानन महाराज सेवा समितीच्या माध्यमातून भैय्यासाहेब पाटील हे आज पासून मेहकर विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यांनी 31 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन मेहकर मतदारसंघात निवडणूक लढविण्यासंदर्भात माहिती दिली मी सध्या तरी कोणत्याही पक्षाकडे इच्छुक नसून मी जनतेचा उमेदवार आहे जनतेच्या हितासाठी मी मेहकर विधानसभेमध्ये निवडणूक लढवत असून जनता जनार्दन मला नक्कीच आशीर्वाद देईल असा विश्वास भैयासाहेब पाटील यांनी व्यक्त केला भैय्यासाहेब पाटील म्हणाले की गेल्या 20 ते 22 वर्षापासून मी जनतेच्या संपर्कात आहे राजकारणात नेहमी सक्रिय असून राजकारणाच्या माध्यमातून शेतकरी गोरगरीब सुशिक्षित बेकार महिलावर्ग यांच्या प्रश्नासाठी नेहमी प्रयत्न करीत असतो मेहेकर लोणार मिळून असलेल्या मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात कोणताच पाहिजे तसा विकास झालेला नाही समस्या जैसे थे तैसे कायमच आहेत मेहकरचे बसस्थानकाचे भिजत घोंगडे गेल्या चार ते पाच वर्षापासून जसेच्या तसेच आहे एवढे वर्ष बस स्थानक तयार करण्यासाठी लागत आहेत तर इतर विकासाच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे भैय्यासाहेब पाटील यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले सध्या तरी मी कोणत्याच पक्षाकडून संपर्क किंवा प्रचार करीत नसून वेळेवर घडणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहे भाजपच्या माध्यमातून माझी सुरुवात झाली असून 2022 मध्ये मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे तर श्री गजानन महाराज सेवा समितीच्या माध्यमातून मी सध्या काम करीत असून येणाऱ्या निवडणुकीत मी जनतेचा उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहे जनतेच्या अडचणी समस्या सोडविण्यासाठी मी 24 तास जनतेच्या सेवेत राहील मेहकर मतदार संघाच्या विकासासाठी मी अहोरात्र शासनापर्यंत व प्रशासनापर्यंत प्रयत्न करणार असून जनतेने मला मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत आतापर्यंत जे सरकार आले त्यातील सत्ताधारी आमदारांनी कोणताच विकास मेहकर मतदार संघात केल्याचे दिसत नाही मेहकर मतदार संघात अनेक समस्या आहेत सुशिक्षित बेकारांची संख्या वाढली आहे,अनेक गावांना रस्ते नाहीत कोट्यावधी रुपयाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहेत मात्र या योजना अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाच्या व अर्धवट परिस्थितीमध्ये असल्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये पाण्यात जात आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण आपापल्या परीने आश्वासने देत असतात मात्र मी केवळ आश्वासन न देता जनतेच्या आशा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे जनतेने मला सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी भैय्यासाहेब पाटील यांनी केले तर आज पासून त्यांनी जनतेशी संपर्क सुरू केला असून हे मेहकर मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी ते ठाम आहेत