ऋशांक चव्हाण व डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्याकडून विविध गणरायांची आरती
सध्या सर्वत्र गणेश उत्सव सुरू आहे या गणेशोत्सवामध्ये गणेश भक्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात या कार्यक्रमाला विविध राजकीय लोक नेतेमंडळी सामाजिक कार्यकर्ते यांना आमंत्रित करण्यात येत असते याच पार्श्वभूमीवर मेहकर मतदार संघात इच्छुक असलेल्या ऋतुजा चव्हाण व त्यांचे पती डोणगाव अर्बनचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण यांना डोणगाव येथे विविध गणपतीची आरती करण्याचा मान देण्यात आला.
डॉक्टर ऋतुजा चव्हाण ह्या मेहकर मतदार संघात इच्छुक असून त्यांनी गेल्या काही दिवसापासून आपला संपर्क वाढविला आहे तर अगोदर त्यांची मतदार संघात चांगली ओळख असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे तर विविध गणेश मंडळाकडून सुद्धा त्यांना आरतीसाठी बोलण्यात येत आहे