HAVA VIDHANSABHECHI प्रकाश डोंगरे विधानसभेच्या रिंगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून इच्छुक - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, September 7, 2024

HAVA VIDHANSABHECHI प्रकाश डोंगरे विधानसभेच्या रिंगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून इच्छुक


मेहकर विधानसभा निवडणुकीत आता प्रकाश डोंगरे सुद्धा रिंगणात उतरणार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रबळ इच्छुक असून त्या संदर्भात त्यांनी जनसंपर्क सुद्धा सुरू केला आहे प्रकाश डोंगरे 2014 पासून युवा सेनेचे सक्रिय काम करत आहेत युवा नेतृत्व असून राजकारणाची संपूर्ण माहिती आहे तर मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील रहिवासी असून मेहेकर मतदारसंघातीलच उमेदवार असल्याने मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता जाणवत आहे महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकीट मिळावे यासाठी अनेक हौसे - नवसे मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधत आहेत केवळ मेहकर विधानसभेवर डोळा ठेवून ऐन निवडणुकीच्या तोंडावरच अनेक जण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात प्रवेश घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र प्रकाश डोंगरे हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतरही प्रकाश डोंगरे हे उद्धव बाळासाहेब गटाकडेच कायम राहिले व आजपर्यंत त्यांची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे मेहकर मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात इच्छुकांनी भेटीगाठी, प्रचाराचा जोर धरला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात काही मोजके शिवसैनिक उद्धव बाळासाहेब सेने सोबत एकनिष्ठ राहिले, पक्षाचे संघटन मजबूत करणे करून ,पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला त्यामध्ये युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश डोंगरे यासह अनेक शिवसैनिक आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने सोबत एकनिष्ठ आहेत.. उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे.या  एका निश्चयावर प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक पक्षासाठी झटून काम करत आहे. बुलढाणा जिल्हा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश डोंगरे हे सातत्याने मागील 10 ते 12 वर्षांपासून शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत. पक्षाचे मेळावे ,बैठका, मोर्चे आंदोलन उपोषण यासह जनहिताचे  कुठले कार्यक्रम असतील. पक्षाने दिलेली जबाबदारी असेल अतिशय सक्षमपणे सांभाळण्याचं काम प्रकाश डोंगरे यांनी मागील काळात केलेली आहे व सातत्याने करत आहे. डोंगरे मेहकर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असून मतदाराची जनसंपर्क करीत आहेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या त्यांचा चांगला अभ्यास आहे मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी गावातील ते रहिवासी असून विविध उद्योग व्यवसाय सोबत ते  राजकारणातही सक्रिय आहे .अनेकांसोबत असलेला दांडगा जनसंपर्क मैत्रीचा 'बहर'निर्माण करणारे व्यक्तिमत्व प्रकाश डोंगरे येणाऱ्या मेहकर विधानसभा निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहे. प्रकाश डोंगरे हे मुंबईत अग्निशामक दलात सेवा करत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांची नेहमी

 उठबस असल्यामुळे मातोश्रीवर वरिष्ठांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मागील आठवड्यात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर त्यांची शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यासह महत्त्वपूर्ण बैठक होती प्रकाश डोंगरे हे मागील बारा वर्षापासून पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत.मेहकर विधानसभा लढवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाकडून प्रकाश डोंगरे इच्छुक आहेत मेहकर मतदार संघातील जनतेच्या मनात 'स्थानिक' उमेदवार अपेक्षित असून प्रकाश डोंगरे हा तरुण शासकीय नोकरी सोडून राजकारणामध्ये येऊन गोरगरीब, विद्यार्थी, तरुण व सर्व सामान्य जनतेला कायम "मदतीचा हात "पुढे करणारा 'समाजकारणी'म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे.

Post Top Ad

-->