मस्साजोग येथिल सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज 29 डिसेंबर रोजी बिबी शहर कडकडीत बंद - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, December 29, 2024

मस्साजोग येथिल सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज 29 डिसेंबर रोजी बिबी शहर कडकडीत बंद

(आपला विदर्भ लाईव्ह देवानंद सानप बुलढाणा)

बिबी,मस्साजोग जिल्हा बीड येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्याप्रकरणी लोणार तालुक्यातील बिबी येथे आज 29/ 12/ 2024 रोजी बिबी शहर अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व बाजारपेठ कडकडीत बंद पाळण्यात आला 
हा बंद सकल मराठा समाजाच्या वतीने ठेवण्यात आला होता 
 याबाबत चे निवेदन बिबी पोलिसांना 28 डिसेंबर रोजी देण्यात आले होते यावेळी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली 
 संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या वर कडक  शासन कार्यवाही होण्यासाठी व तात्काळ अटक करण्यासाठी बिबी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिबी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता वाहतूक सुरळीत चालू होती निवेदनावर अनेक समाज बांधवांच्या सह्या होत्या 

Post Top Ad

-->