BULDANA MEHKAR, एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी कामाच्या मंजुरीची प्रत संजय रायमुलकर यांना दिली. - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, December 20, 2024

BULDANA MEHKAR, एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी कामाच्या मंजुरीची प्रत संजय रायमुलकर यांना दिली.


मेहकर बसस्थानक काँक्रीटीकरणासाठी ४ कोटी २२ लाख रुपये संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून मंजूर

मेहकर .माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून तीन कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या मेहकर बस स्थानकाचे काम जवळपास पूर्ण झाले असून आता त्यांच्याच प्रयत्नातून बस स्थानक परिसराच्या काँक्रिटीकरणासाठी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी ४ कोटी २२ लाख ५० हजार रुपये मंजूर केले असून त्यांनी आदेशाची प्रत काल ता.१९ रोजी नागपूर येथे संजय रायमुलकर यांना दिली.

            मेहकर बस स्थानकाचे काम पूर्ण होण्याआधीच एक वर्षापासून माजी आमदार संजय रायमुलकर यांनी त्यांच्या कार्यकाळात बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणास निधी मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सदर कामास आता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून त्यासाठीच्या चार कोटी २२ लाख ५० हजार रुपये निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे .सदर आदेशाची प्रत नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान  एस टी महामंडळाचे अध्यक्ष  भरत गोगावले यांनी संजय रायमुलकर यांना काल दिली.

वाहनतळाचे काँक्रिटीकरण करणे ,सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग ची व्यवस्था करणे यासाठी सदर निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया लवकरच पार पडणार असून त्यानंतर सदर कामास सुरुवात करण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी विभाग अमरावती यांच्याकडून आता पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. नव्या बसस्थानकाचे लोकार्पण लवकर व्हावे म्हणून कॉंक्रिटीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण  करण्याच्या सूचना संजय रायमुलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

          मेहकर एस टी आगाराची इमारत नव्याने बांधण्याचा प्रस्तावही माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. आगार कार्यालय इमारत, कार्यशाळा शेड, दुरुस्ती रॅम्प, वाहन परीक्षक खोली परिसराचे काँक्रिटीकरण आदींसाठी १४ कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

Post Top Ad

-->