मतदारसंघातील समस्येसाठी आमदार ॲक्शन मोडवर
आपला विदर्भ LIVE देवानंद सानप बिबी
सतत शेतकरी कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच अडचणीत असल्याने शेतकऱ्याला नाहक त्रास भोगाव लागतो पळसखेड चक्का येथील गेल्या एक वर्षापासून शेतामध्ये डीपी बंद अवस्थेमध्ये होती म्हणून शेतकऱ्याचे खरीपचे पीक तर गेलेच पण रब्बीचे पीक सुद्धा हातामधून जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता म्हणून
शेतकरी पळसखेड चक्का येथील दिनांक 23 डिसेंबर रोजी आमदार श्री मनोज कायंदे यांची भेट घेतली आणि त्यांना सगळ्या समस्या समजून सांगितल्या आणि शेतकऱ्याला रब्बी पिकाला लाईट नसल्यामुळे पीक हातातून जाणार आहे असे सांगितल्यानंतर लगेच त्यावर त्यांनी लगेच अधिकाऱ्याला सूचना देऊन पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा चक्का येथील डीपी ताबडतोब बसवा असे आदेश दिल्यानंतर आज दिनांक 27 डिसेंबर रोजी येथील डीपी बसवण्यात आल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आनंद व्यक्त करण्यात येत आहे
आता रब्बीचे पीक शेतकऱ्यांची गहू हरभरा शाळु आणि बीज उत्पादक शेतकरी शेडनेट यांना आणि या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा यावेळी उपस्थित शेतकरी शेतकरी योद्धा कृती समिती चे समन्वय श्री बालाजी सोसे, श्री अर्जुन मुंडे साहेब, श्री गणेश सोसे ग्रामपंचायत सदस्य, पांडुरंग सोसे, प्रमोद नागरे, राहुल आंधळे, धनंजय सोसे, आधी शेतकरी उपस्थित होते