मेहकर येथील एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, January 14, 2025

मेहकर येथील एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन


बुलडाणा,  दि. 14 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शक केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर व एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालय मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.16 जानेवारी 2025 रोजी मेहकर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि केंद्र शासनाच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत नॅशनल करियर सर्विसच्यावतीने बुलढाणा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार नोंदणीकृत उमेदवारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. सदर मेळाव्यामध्ये बुलढाणा अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटी, सह्योग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी, क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण कूटा यासारख्या  सहापेक्षा अधिक नामांकित उद्योजकांनी त्यांच्याकडील 370 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केलेली आहे. या मेळाव्याद्वारे नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजु व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवुन त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://mahaswayam.gov.in व श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार अंतर्गत मॉडेल करीयर सेंटरच्या https://www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी असलेल्या अथवा नसलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष महिला उमेदवारांनी दि. 16 जानेवारी 2025 रोजी एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालय, राम नगर बस स्टँडच्या मागे, मेहकर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहुन रोजगारांच्या संधीचा लाभ घ्यावा. 

या रोजगार मेळाव्यात पात्र, गरजु व नौकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता सुध्दा अर्ज करु शकतात. तरी आवश्यक कागदपत्रांसह स्वखर्चाने रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आपली नाव नोंदणी करावी. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दूरध्वनी 242342 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शक केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटरचे सहायक आयुक्त गणेश बिटोडे यांनी केले आहे.

Post Top Ad

-->